गुरुचरित्राचे पारायण कसे करावे /मराठी भावार्थ
श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो . श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसूंन दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे . श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खलील नियम पाळावेत .
१)श्री गुरुचरित्र सप्ताह करतांना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी ;कारण शुक्रवार हा नृसिंहसरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे .
२)श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा .
३) श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे . वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरवात करावी .
४)श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे ३:०० ते सायं. ४:०० या दरम्यान करावे . दुपारी १२:०० ते १२:३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे
५ )श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेवु नये . आपली आई,पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही .
६)श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये ,स्वतःच्या हाताने दाढी करावी . तसेच या काळात चामद्याच्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे . श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे .
७)श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये . स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे,अर्धवट सोडू नये . श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे . वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे .
८)सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नेवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णु सहस्त्रनाम वाचावे .
९) श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धती :
पहिला दिवस :अध्याय १ ते ९
दूसरा दिवस :अध्याय १० ते २१
तिसरा दिवस : अध्याय २२ ते २९
चौथा दिवस :अध्याय ३० ते ३५
पाचवा दिवस :अध्याय ३६ ते ३८
सहावा दिवस : अध्याय ३९ ते ४३
सातवा दिवस : अध्याय ४४ ते ५३
१०) श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु २१ दिवसांत ३ पारायण,४९ दिवसांत ७ पारायण करावयाच्यादेखील पद्धती आहेत. सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी . सांगतेच्या दिवशी सकाळी १०:३० वा . श्री दत्त महाराज ,श्री कुलदेवता,श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचारित्र ग्रंथ करिता नेवेद्य मांडावा . ग्रंथाचा नेवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे ,
११)श्री गुरुचरित्र वाचच्या कालावधीमध्येसुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देवू नये .
*)श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये ,एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तीक पारायण सात दिवसांचे असावे .
श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीचा साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना ,असाध्य आजार झालेल्यांना ,जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना ,पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे . श्री गुरुचरित्र हे हवनयुक्त ही करता येते . त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू ,तांदूळ,तीळ व तूप असे एकत्र हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा . अति आजारासाथी नाडीवरदेखील श्री गुरुचरित्र वाचता येते .
0 टिप्पण्या