👇
गुरुपुष्यामृत योग २०२३ 

गुरुवारी गुरु ग्रहाचा उदय होत असून,याच दिवशी गुरु पुष्य नक्षत्रांचा शुभ संयोग तयार होत आहे. याच दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी असे शुभ योगही तयार होत आहेत,त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. 
गुरुपुष्यामृत योगाची तिथी,शुभ योग,शुभ मुहूर्त आणि महत्त्व पुढीलप्रमाणे :-
पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला  गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते. गुरुवारी,भगवान विष्णुबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख ,वैभव आणि संपत्ति प्रदान करणार मानले जाते . ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे . पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे . जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते . 

गुरुपुष्य योगावर हे होत आहेत इतर शुभ योग :-
गुरुवारी २७ एप्रिल ला गुरुपुष्यामृत योग असून,या दिवशी वरियान योगासह सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग ही असतील. यासोबतच शुभकर्तारी ,वरिष्ठ ,भास्कर,उभयचरी ,हर्ष,सरल आणि विमल नावाचा राजयोग ही तयार होईल . जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील . हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तु ,जमीन,घर ,वाहन,सोन्याचे दागिने  इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. 

गुरुपुष्य योग मुहूर्त :-
यावेळी , गुरुवार २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटे ते दुसऱ्यादिवशी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत गुरु पुष्य योग राहील.
 
अभिजीत मुहूर्त :दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटांपर्यंत . 
विजय मुहूर्त :दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत .