सारामृत पारायण कसे करावे ? Saramrut parayan kase karave ?


गुरुचरित्राचे पारायण कसे करावे ?

 नमस्कार बंधु आणि भगिनिंनो  तुमचे स्वागत आहे,

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ(पारायण) कसा करावा.?

।। श्री स्वामी चरित्र सारामृत :पारायण पद्धती ।। 

उत्तम फलप्राप्तीकरिता 'श्री स्वामीचरित्र सारामृत'या पोथीचे  पारायण कसे करावे . 

१ )दिनशुद्धी (उत्तम दिवस )पाहून 'श्रीस्वामीचरित्र सारामृत'पोथीचे पारायण करावे. 

२)श्रीस्वामीसमर्थांच्या भक्तीला,सेवेला काळवेळेचे बंधन नाही,परंतु पारायणासाठी  शक्यतो सोमवार,गुरुवार आणि पर्वणीकाळ हा उत्तम समजावा .

३)दशमी,एकादशी व द्वादशी या दिवशी पोथीचे ३ दिवसाचे पारायण करावे . प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने ७ अध्याय वाचावेत . 

४)ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वचन करावे . याप्रमाणे आपली श्रद्धा ,भक्ति तसेच इच्छेनुसार 'श्रीस्वामीचरित्र सारामृत ' संपूर्ण पोथीचे ०३,०७,११ वा २१ अशी पारायणे  करावीत. 

५)सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनपूर्वी पारायण करावे . त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नानानंतर शुद्ध वस्त्र नेसून मस्तकी गंध लावावे. 

६)नित्याची देवपूजा करावी,कुलदेवता,इष्टदेवता,गुरुदेव व श्रीस्वामींचे स्मरण करावे . वडीलधाऱ्यांना  वंदन करावे . पारायणास प्रारंभ करताना (पहिल्या दिवशी )उजव्या हातावर  पळीभर पाणी घेऊन आपले नाव ,तिथी (वा दिनांक )व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने ,उद्देशाने वा प्राप्तीसाथी हे पारायण करीत आहोत हे सांगावे अर्थात पारायणाछा संकल्प करावा आणि आपला उद्देश्य सफल व्हावा म्हणून श्रीस्वामिसमर्थांची करून ते पाणी ताम्हनात सोडावे . पुढे हे पानी आपल्या घरातील तुळशीत ओतावे . 

७)चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरूण त्यावर श्रीस्वामींची तसबीर (प्रतिमा ) वा मूर्ती ठेवावी . चौरंगा भोवती रांगोळी काढावी . समई लावावी . गंध ,पुष्प ,धूप ,दीप ,नैवेद्य या पंचोपचारांनी श्रीमहाराजांची पूजा करावी . गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. 

८)आसनावर बसून ,श्रीमहाराजांना व पोथीला वंदन करून तसेच अध्यायाचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वचन करावे . त्या समयी श्रीस्वामी महाराज आपल्या समोर साक्षात  बसलेले आहेत असा मनात भाव असावा. चित्त प्रसन्न असावे . वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा . वाचन झाल्यावर श्रीस्वामींच्या प्रतिमेला/मूर्तीला गंध,हलदकुंकू व फूल वाहावे . उदबत्ती व धूप-दीप ओवाळून वंदन करावे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा व सर्वानी प्रसाद घ्यावा . 

९)'श्रीस्वामीचारित्र सारामृत'पोथीची सांगता  करताना ब्राम्हनांस वा ब्राम्हण दांपत्यास भोजन ,वस्त्र व  दक्षिणा देवून सन्मान करावा व संतुष्ट करावे . 

१०)जय दिवशी पारायनाची सांगता  होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्रीस्वामीमठात किंवा मंदिरात जाऊन श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन घ्यावे . 

११)पारायण काळात सदाचाराने राहावे . एकभुक्त  राहावे . ब्रम्हचर्य पाळावे . वादविवाद ,भांडणतंटा आदि गोष्टी टाळाव्यात. श्रीस्वामींचे नामस्मरण करावे ,तसेच त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन ,मनन व आत्मपरीक्षण करावे. 

श्रीस्वामींचा नामजप पुढीलप्रमाणे .....'श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ

श्री स्वामी समर्थ

 चला पारायणास सुरवात करूया