Subscribe Us

header ads

akshaya tritiya 2023/अक्षय तृतीया 2023



अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा  

अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत, जी केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
  • हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे . यंदा 22 एप्रिल 2023 ,शनिवारी अक्षय तृतीया आहे.
  • वैशाख शुक्ल पक्ष म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस व्रत आणि सण म्हणून साजरा केला जातो . व्रत म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी किंवा अमरण कृतीत आणण्याचा विशिष्ट धार्मिक रितीधन . हा शब्द क्षण या संस्कृत काल वाचक शब्दापासून बनला आहे . विशिष्ट  तिथीला म्हणजेच विशिष्ट काळात विशिष्ट देवतेची उपासना करून . आनंदाने साजरा केला जाणार दिवस म्हणजे सण . 


  • प्रथम पाहूया अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे ते :-
  १) अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे .

 येथे मुहूर्त म्हणजे फल प्राप्तीसाठी शुभ कार्यचा आरंभ करण्यासाठीचा कालखंड. साधारणतः भिन्न शुभ कार्यासाठी भिन्न मुहूर्त आणि तेही अल्पकालावधी चे असतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तमात्र असे असतात की या दिवशी यातील तीन मुहूर्तचा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा मुहूर्त असतो. 

१)चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा . 
२)वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षयतृतीया . 
३)आश्विन शुक्ल पक्ष म्हणजे दसरा .  .       

२)  अक्षय फळ देणारा दिवस अक्षय तृतीया.  हे अक्षय तृतीयेचे दुसरे महत्व आहे . अक्षय फळ देणार दिवस . या तिथीला केलेले दान आणि हवन यांचे क्षया ला जात नाही म्हणजे न्यून होत  नाही म्हणून हिला ऋषि मुनींनी अक्षय तृतीय असे म्हटले आहे. मदनरत्न या ग्रंथात भगवान श्रीकृष्णा ने या तिथीला देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे न्यून होणारे असते असे सांगितले आहे . 
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे ?

 
आता पाहू - अक्षय तृतीय या दिवशी करावयाचे धार्मिक कृत्ये . 
१) सकाळी तीर्थक्षेत्री स्नान करावे . ते शक्य नसल्यास नदी ओढा यासारख्या जलात स्नान करावे. ज्यांना हे ही शक्य नाही ,त्यांनी स्नानाच्यापण्यात गंगा यमुना आधी पवित्र नद्यांचे आवाहन करून त्या पाण्याने स्नान करावे. 
२)रांगोळी -
  या दिवशी श्रीविष्णूचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या सात्विक रांगोळी काढाव्यात.
३)पूजा - 
  या दिवशी श्रीविष्णु आणि वैभवलेकशमी यांच्या प्रतिमांचे भक्तिभावाने पूजन करावे. असे अक्षय तृतीयेचे महत्व अनन्य साधारण आहे. 
४)तीळतर्पण -
याशिवाय अक्षय तृतीया या दिवशी करावयाची एक महत्त्वाची कृती म्हणजे तीळतर्पण . तीळतर्पण म्हणजे देवता आणि पितर यांना ते अन्न आणि पानी देवून तृप्त करणे .  पितर म्हणजे पूर्वजांचा लिंगदेह .  ज्यांचे वडील हयात नाहीत अशा पुरुषांनी तिळतर्पण करावे. देवतांना पांढरे तीळ तर पितरांना काळे तीळ अर्पण करतात . 
 प्रथम पाहू 
देवतांसाथी तिळतर्पण करण्याची पद्धत 
१. उजव्या हातात पांढरे तीळ घ्यावेत . 
२. साक्षात देवतेला तीळ अर्पण करत आहे असा भाव ठेवावा . 
३. त्यानंतर डाव्या हाताने पळीत (पूजेची संध्या पळी )पानी घेऊन ते तिळावर घालून ते देव तीर्थावरुण म्हणजे बोटांवरुंन तांब्याच्या ताम्हणात (ताटात ) अर्पण करावे. व देवाला नमस्कार करावा . 

आता पाहू 
पितरांना तीळतर्पण करण्याची पद्धत -
१)उजव्या हातात काळे तीळ घ्यावेत . 
२)तिळा मध्ये श्री विष्णु आणि ब्रम्हा या देवतांना येण्याची प्रार्थना करावी . 
३)त्यानंतर हातातील तीळावर पानी घालून ते तीळ पित्र तीर्थावरुण  म्हणजे अंगठा आणि तर्जनी याच्या जवळ जे बोट बोट आहे यांच्या मध्यातुन ताम्हणात अर्पण करावे. 
पितरांसाठी तीळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवावा .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या